Posts

PREM

      प्रेम करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही, अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली कि झाले प्रेम... माझे ही तसेच झाले, माझ्या प्रमाणे अनेकांचे झाले ही असेल.  मी आणि ती एकाच कॉलेज मध्ये होतो आणि एका वर्गात सुद्धा पण एकाच कॉलेज आणि वर्गात असण्याचा काही एक उपयोग नव्हता कारण आम्ही कधी एकमेकांशी बोलतच नव्हतो त्या मुळे आमच्यात असकाही होईल याची कल्पना देखील आम्हाला नव्हती.  पण कोणास ठाऊक की १५ मे २०१७ चा दिवस हा आमच्या आयुष्याला वेगळच वळण देणार होतं. हा दिवस म्हणजे तिचा वाढदिवस याच दिवशी मी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण बोललो. कारण तिच्या त्या दिवसात सगळ्यात शेवटी शुभेच्छा देणारा मेसेज बहुतेक मीच केला असावा. याच कारणाने आमचा एकमेकांसोबत बोलणं सुरु झालं. हळू हळू आमचा बोलणं वाढत गेलं, एकमेकांसोब एकमेकांसोबत sharing वाढत गेली. अस करता करता एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले आणि याच आकर्षणाचे शेवटी प्रेमात रूपांतर कधी झाले हे कळलेच नाही. आमचा एकही दिवस एकमेकांसोबत बोलल्याशिवाय जायचा नाही. किंवा फोन केल्याशिवाय गेला नाहीय या सगळ्यांमुळे...

The Shield

Image
मैत्री हा विषय भलेही साधा असेल पण विचार करायला लावणारा आहे...    शाळा कॉलेज मध्ये नेहमी मित्र मैत्रिणी आपल्या नेहमी परिचयाचे असतात. त्यामुळे आपण त्यांना आणि ते आपल्याला चांगलेच ओळखतात. आपला स्वभाव, वागणूक, बोलणे चालणे सगळच आणि आपण त्यांचा मित्र/मैत्रीण म्हणून स्वीकारतो ज्यांना आपण ओळखतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फक्त मैत्रीचा आदर...   कारण मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, असते.  एकमेकांशी आपण भावनेने बांधेलेले असतो. मैत्री म्हणजे शब्दाशिवाय एकमेकांच मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बणन मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्यात प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट...   पण खरं बघायला गेल तर आजकाल "यारी ही इमान मेरा यार मेरी जिंदगी" हे शब्द फक्त बोळण्यापुरतेच राहिलेय.  खूप कमी लोक असतात जे अस वागतात...   आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं भेटत असतात. कोणाशी कामाच्या निमित्ताने संपर्कात आलेलं असतं, कोणी आवडनिवड सारखी असते म्हणून एकमेकां...