PREM

     प्रेम करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही, अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली कि झाले प्रेम... माझे ही तसेच झाले, माझ्या प्रमाणे अनेकांचे झाले ही असेल. 

मी आणि ती एकाच कॉलेज मध्ये होतो आणि एका वर्गात सुद्धा पण एकाच कॉलेज आणि वर्गात असण्याचा काही एक उपयोग नव्हता कारण आम्ही कधी एकमेकांशी बोलतच नव्हतो त्या मुळे आमच्यात असकाही होईल याची कल्पना देखील आम्हाला नव्हती. 

पण कोणास ठाऊक की १५ मे २०१७ चा दिवस हा आमच्या आयुष्याला वेगळच वळण देणार होतं. हा दिवस म्हणजे तिचा वाढदिवस याच दिवशी मी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण बोललो. कारण तिच्या त्या दिवसात सगळ्यात शेवटी शुभेच्छा देणारा मेसेज बहुतेक मीच केला असावा. याच कारणाने आमचा एकमेकांसोबत बोलणं सुरु झालं. हळू हळू आमचा बोलणं वाढत गेलं, एकमेकांसोब एकमेकांसोबत sharing वाढत गेली. अस करता करता एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले आणि याच आकर्षणाचे शेवटी प्रेमात रूपांतर कधी झाले हे कळलेच नाही.
आमचा एकही दिवस एकमेकांसोबत बोलल्याशिवाय जायचा नाही. किंवा फोन केल्याशिवाय गेला नाहीय या सगळ्यांमुळे आम्हा दोघांना एकमेकांची सवय झाली होती.
तिच्या हसण्याची तिच्या बोलण्याची, रुसल्यावर मनवण्याची जणू मला सवयच लागली आणि मलाही हे सगळं नकळत आवडू लागलं आणि तिलाही आवडू लागलं
पण ती काही बोलेना न मी काही बोलायचो पण दोघांना प्रेम झालेलं हे मात्र तितकंच खरं!!!
शेवटी असच बोलता बोलता काही दिवस निघून गेले पण त्या दिवशीची रात्र ही वेगळीच होती त्या दिवशी आम्ही नेहमी पेक्षा जरा जास्तच जवळचं बोलू लागलो आणि बोलता बोलता मस्करीत का होईना मी तिला बोलत होतो propose कर आणि ती मला बोलत होती propose करायला. आमच्या दोघांच्या मनात एकच चाललं होतं पण बोलायला कोण तयार नव्हतं. शेवटी थोड्या वेळाने का होईना मी तिला प्रपोज केला तिला आधी मस्करी वाटली पण तिचा तो गैरसमज मी दूर केला आणि तिला परत विचारलं त्यात तिने क्षणाचाही विलंब न लावता तिने मला होकार दिला आणि इथे माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो दिवस होता २१ जुलै रात्री १:०० वाजता तिने मला होकार दिला.
त्या दिवसानंतर माझा दिवस तिच्या पासून सुरु होऊन तिच्यावरच संपत होता. सकाळी कॉलेज ला तिच्या सोबत जाणं, एक दिवस आड आमचा फिरायला जाणं तर नेहमीचं असायचं.. असंच करता करता आमच्यात प्रेम वाढू लागले आम्हाला सुध्दा दुसऱ्यांसारख दुनियेची काहीच पर्वा नव्हती. कोण काय बोलेल किंवा कोणाला काही वाटेल.
मी माझ्या मित्रांना नकळत तिला होकार दिला होता आणि तिने सुद्धा पण जस जसा काळ जात राहिला तस तसा मी माझ्या मित्रांना सुद्धा सांगितले.त्यांनासुद्धा ती पसंत पडली. त्यानंतर ती माझ्या मित्रांसोबत राहायला लागली. एकेदिवशी अचानक विचार करत असताना आठवलं की एक दिवस होता की आम्ही एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो पण आजच्या घडीला आम्ही एकमेकांशिवाय राहुही शकत नव्हतो. आम्ही एकमेकांमध्ये एवढे गुंतलो होतो की मी माझा पुढचं आयुष्य हे तिच्या शिवाय जगण्याचा विचार सुद्धा केल्याने माझ्या अंगावर काटा आणून सोडत असे. खूप कमी वेळात आम्ही खूप जवळ आलो होतो. याच जवळीकमुळे मी कधी तिला सोडून जाण्याचा विचार देखील माझ्या मनात येऊ दिला नाही.
मला माहीत होतं की ती तिच्या वडिलांवर खूप प्रेम करायची...आणि तिचे वडील सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचे...त्याच प्रमाणे मी तिला प्रेम द्यायचा विचार केला..आणि काहीही झालं तरी हीलाचा माझ्या आयुष्याचा जीवनसाथी बनवण्याचा विचार केला. खूप म्हणजे खूप प्रेम करायचो तिच्यावर,
मला माझ्या आयुष्यात जशी lifepartner म्हणून हवी असलेली मुलगी मला तिच्या निमीत्ताने मिळाली. 

Comments