The Shield
मैत्री हा विषय भलेही साधा असेल पण विचार करायला लावणारा आहे...
शाळा कॉलेज मध्ये नेहमी मित्र मैत्रिणी आपल्या नेहमी परिचयाचे असतात. त्यामुळे आपण त्यांना आणि ते आपल्याला चांगलेच ओळखतात. आपला स्वभाव, वागणूक, बोलणे चालणे सगळच आणि आपण त्यांचा मित्र/मैत्रीण म्हणून स्वीकारतो ज्यांना आपण ओळखतो.
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फक्त मैत्रीचा आदर...
कारण मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, असते. एकमेकांशी आपण भावनेने बांधेलेले असतो.
मैत्री म्हणजे शब्दाशिवाय एकमेकांच मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बणन मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्यात प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट...
पण खरं बघायला गेल तर आजकाल "यारी ही इमान मेरा यार मेरी जिंदगी" हे शब्द फक्त बोळण्यापुरतेच राहिलेय. खूप कमी लोक असतात जे अस वागतात...
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं भेटत असतात. कोणाशी कामाच्या निमित्ताने संपर्कात आलेलं असतं, कोणी आवडनिवड सारखी असते म्हणून एकमेकांशी जोडले जातात तर काहींची गरज म्हणून एकत्र असतात. या ना त्या कारणाने त्यांच्यात एक नातं तयार होतं. मैत्रीचं! असं नातं ज्यात वय, वजन, रंग, स्वभाव, पगार या आणि अशा असंख्य अटी-नियमांचं ओझं नसतं. खरं तर मैत्रीची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते. कोणाला मैत्री म्हणजे प्रेम वाटतं, कोणाला मैत्री म्हणजे आयुष्य कोणाला मैत्री म्हणजे आनंद वाटतो. पण ‘त्यांच्या’ लेखी मैत्री म्हणजे कुटुंबच आहे! न सांगताही समोरच्या व्यक्तीच्या मनातलं कळतं, अशा हक्काच्या नात्यांपैकी एक म्हणजे मैत्री.
आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मावशी, आत्या वगैरे नात्यांचं त्या-त्या जागी महत्त्व आहे. ही नाती जन्मत:च प्रत्येकाशी जोडली जातात. ही नाती निवडण्याची संधी मिळत नसते. पण, मैत्रीचं नातं आवड आणि इच्छेनुसार निवडलं जातं. ‘बाय चॉइस रिलेशन’असंम्हणू या हवं तर. मैत्रीचं नातं कोणाशी, कसं, कुठवर टिकवायचं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. काही वेळा मैत्रीत ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असं होतंही असतं. पण, यातच मैत्री खऱ्या अर्थाने खुलत जाते. एरवी कुटुंबासोबत राहत असताना मित्रपरिवारासोबत घालवत असलेला काळ तुलनेन कमी होतो. पण, मित्र-मैत्रिणींसोबतच राहात असाल तर ते दुसरं कुटुंब होऊन जातं. कुटुंब म्हटलं की घरातल्या सदस्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, व्यक्त होण्याची पद्धत हे सगळं माहीत असतं. पण, गोष्टींचा फायदा हा होतच असतो.
अविनाश कांबळे, सुरज महाडकर, जयेश बच्छाव, अक्षय खैरे, रोहन कासारे, भावेश गावकर आणि मी अशा या सात जणांची मैत्री म्हणजे त्या प्रत्येकासाठी एक कुटुंब आहे.
मित्रपरिवार म्हणजे दुसरं कुटुंबच! असंच एक कुटुंब तयार झालं होतं मुंबईतील विलेपार्ले येथील ‘साठ्ये महाविद्यालयामध्ये’. महाविद्यालयातील सातही जणांनी विद्यार्थी दशेच्या काळात एकमेकांना सांभाळून, समजून घेणारा, प्रेम करणारा मित्रपरिवार एकमेकांशी आजही तितकाच जवळ आहे.
मैत्रीचे सुरवातीचे दिवस हे फार गोड असतात. तसचं काहीसं आमचंही होतं, रोज कॉलेज ल येणं आणि लेक्चर ला पोचायला उशीर झालाच तर ठरल्याप्रमाणे कॅन्टीन मधल्या कॉर्नर वाल्या टेबल ला जाऊन हजेरी लावणे. ही हजेरी नकळत सर्वांना पाठ झालेली असायची. मग लेक्चर संपेपर्यंत कॅन्टीन मधल्या चहा चा आस्वाद घेत बसणं आणि मग लेक्चर संपला की वर्गात येऊन धिंगाणा घालणं. असं करता करता आम्ही सातही जणाची मैत्री कशी एवढी घट्ट होत गेली कधी कळलीच नाही.
कधी जर चुकून कॉलेज मध्ये भेट झाली नाहीच तर अंधेरीमधील एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन खाली सर्वांची बैठक ही ठरलेलीच असायची. त्यामुळे एकही दिवस आमचा असा गेला नाही की आम्ही कधी एकमेकांना भेटलो नसणार.
असे हे आमचे दिवस हसत खेळत गेले. पण मैत्री म्हटलं की त्यात एकमेकांबद्दल आपुलकी जिव्हाळा प्रेम हे येतंच पण त्याच सोबत येत ते म्हणजे राग आणि भांडणं असंच काहीसं आमच्या बाबतीतही घडलं त्यात प्रत्येकाला स्वतःचा राग हा अनावर होणारा रागात कोणालाही काहीही बोलणारा पण पुढच्या ५ मिनीटात सगळा राग रुसवा विसरून "बच्ची नाराज है क्या?" विचारून सगळं पूर्ववत व्हायचं. कोणीही आम्हाला बघुन बोलणार नाही की ५ मिनिटं आधी यांची भांडण झालेली एकमेकांची तोंड न बघायची भाषा करणारे पुढील ५ मिनीटात गळ्यात हात घालुन फिरत असतात.
अशा या ३ वर्षात आम्ही अनेकांची मैत्री तुटताना पाहिलीय आणि नव्याने काही मैत्री जुळताना सुद्धा पाहिलीय पण THE SHIELD या नावाने ओळखली जाणारी ही मैत्री सुरवातीपासून जशी होती अजूनही तशीच आहे आणि पुढेही तशीच राहील.
जरी मला कोणीही विचारले की या कॉलेजच्या तीन वर्षात काय कमावले तर हक्काने सांगेन की THE SHIELD या नावाची मैत्री कमवली.
यात त्यांना संपूर्ण तीन वर्षाच्या कालावधीत उल्लेखनीय अशी काहीच काम देखील केलेली नसली तरी त्यांनी त्याच तीन वर्षात THE SHIELD सदस्य या नावाने प्रसिद्धी जरूर कमावली.
मैत्री म्हणजे काय ?????
कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय , समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी...

![]() |
| DOST NAHI BHAI HAI MERE |
THE SHIELD

Kyaa baat hai....
ReplyDelete👍👍🙌
ReplyDelete